शिरूरमध्ये आलिशान मोटारीतून दारूची तस्करी

शिरूरमध्ये आलिशान मोटारीतून दारूची तस्करी
Published on

शिरूर, ता. २५ : पुणे-नगर महामार्गावरील बीजे कॉर्नरजवळ भरदिवसा आलिशान मोटारीतून बेकायदा दारूची वाहतूक करणाऱ्या तिघांना शिरूर पोलिसांनी गुरुवारी (ता. २५) अटक केली. या कारवाईत मोटारीसह साडेतीन हजार रुपयांच्या देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.
बेकायदा दारू वाहतूकप्रकरणी अविष्कार चंद्रकांत जौंजाळ (वय २५), विशाल चंद्रभान शिंदे (वय ३०) व फिरोज नजमुद्दीन शेख (वय २४, सर्व रा. म्हसे शिंदोडी, ता. श्रीगोंदे, जि. अहिल्यानगर) अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत. पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण व त्यांचे पथक गस्त घालत असताना संशयास्पद मोटार (क्र. एमएच १४ ईएच ०८६९) थांबवण्यात आली. तपासणीत मोटारीत ''टॅगो पंच'' नावाच्या देशी दारूच्या ४८ बाटल्या आढळल्या. पोलिसांनी दारूसाठा आणि वाहन ताब्यात घेतले असून, पोलिस हवालदार विशाल कोथळकर पुढील तपास करत आहेत. गावठी दारूचे धंदे उद्ध्वस्त केल्यानंतर पोलिसांनी आता अवैध देशी-विदेशी दारू वाहतुकीकडे मोर्चा वळवल्याने विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com