

Leopard Attack
sakal
मंचर : येथे रोहन विलास बोंबे (वय १३) याचा बिबट्याने केलेला हल्ल्यात मृत्यू झाला. रविवारी संध्याकाळी घडलेल्या घटनेमुळे परिसरात वन खात्याविषयी व राज्य शासनाविषयी संतापाची लाट पसरली आहे. बिबट्याला ठार करावे आणि हा परिसर बिबटमुक्त करून प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढावा, या मागणीसाठी पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचरजवळ तांबडेमळा-भोरवाडी (ता. आंबेगाव) येथे नंदी चौकात सोमवारी (ता. ३) सकाळी पावणेअकरा वाजता ग्रामस्थ व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी बेमुदत रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. पालकमंत्री अजित पवार व वनमंत्री गणेश नाईक आंदोलनस्थळी येईपर्यंत रास्ता रोको आंदोलन कायम राहील, असा इशारा बोंबे कुटुंबीयांनी व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी दिला आहे.