Pune Police raid Umrati village homemade pistol factory
Sakal
पुणे : शहरातील विविध गुंड टोळ्यांना देशी बनावटीच्या पिस्तुलांची विक्री करणाऱ्या मध्य प्रदेशातील उमराटी गावातील कारखान्यांवर पुणे पोलिसांच्या पथकाने शनिवारी पहाटे छापा टाकला. या कारवाईत ३६ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून २१ पिस्तुले, काडतुसे, तसेच पिस्तुले तयार करण्यासाठी लागणारी सुट्टे भाग जप्त करण्यात आले. पोलिसांनी याप्रकरणी सात जणांना अटक केली आहे. गेल्या काही दिवसांत शहरात टोळीयुद्ध वाढले आहे. त्यातून एकमेकांवर हल्ला करण्यासाठी पिस्तुलांचा वापर झाला आहे.