#PuneRains : पाण्यात झेपावत हवालदार ढमाळांनी वाचविले दोघांचे प्राण

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 15 October 2020

चोरट्यांच्या पाठलागावेळी तुफानी गाडी चालविण्याचा जिल्हा पोलिसांमध्ये नावलौकिक असलेल्या येथील पोलिस वाहन चालक हवालदार संजय डमाळ यांच्या धाडसाने कालच्या पुरात दोन जणांचे प्राण वाचले.

शिक्रापूर : चोरट्यांच्या पाठलागावेळी तुफानी गाडी चालविण्याचा जिल्हा पोलिसांमध्ये नावलौकिक असलेल्या येथील पोलिस वाहन चालक हवालदार संजय डमाळ यांच्या धाडसाने कालच्या पुरात दोन जणांचे प्राण वाचले. येथील ओरा-सिटी ओढ्यात वाहून चाललेल्या चारचाकीतील दोघांचा आक्रोष पाहून संपूर्ण शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने काल एका निनावी फोनवर ही कामगिरी करुन दाखविली. विशेष म्हणजे ढमाळांच्या जोडीला पाण्यात झेपावलेल्या होमगार्ड मनोहर पुंडे यांचेही पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी कौतुक केले. दरम्यान या कामगिरीमुळे जिव वाचलेले अनुकुमार जाधव व निसार शेख यांनी शिक्रापूर पोलिसांचा देव म्हणूनच उल्लेख करुन जिव वाचताच सांष्टांग दंडवत घातले.

 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काल (ता.१४) तूफानी पावसाने शिक्रापूरात पाणी-पाणी झाले. गावातील प्रत्येक ओढ्याला प्रचंड पाणी आले असतानाच ओरा-सिटी गृहप्रकल्पालगत असलेल्या ओढ्यालाही मोठा पूर आला होता. यावेळी या ओढ्यात एक स्विफ्ट कार (एमएच १४ बिआर ४६४४) वाहत चालली असल्याचे व त्यातील दोघे जण जिवाच्य आकांताने ओरडत असल्याचे काहींच्या लक्षात आल्याने त्यांनी शिक्रापूर पोलिसांना फोन केला. ठाणे अंमलदार अनिल जगताप व संतोष शिंदे यांनी ही बाबत पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांना कळविली. शेलारांनी आपले चालक हवालदार संजय ढमाळ, पोलीस शिपाई लक्ष्मण शिरसकर, होमगार्ड मनोहर पुंडे, योगेश बधे यांना घेवून थेट घटनास्थली पोहचले. घटनेचे गांभिर्य पाहून ढमाळ व पुंडे यांनी पूरात उडी मारली व  अनुकुमार विश्वनाथ जाधव (रा.हिवरे रोड, शिक्रापूर) व निसार करीम शेख (रा.शिक्रापूर, मूळ रा.पिंपरखेड ता.जामखेड, जि.अहमदनगर) यांच्या कमरेला दोरी बांधून दोघांना अक्षरशा ओढत पूरातून बाहेर काढले व दोघांना जिवदान दिले. विशेष म्हणजे यावेळी एक श्वान वरील दोघांना वाचविण्यासाठी जी काही धडपड व आरडाओरड करीत होते त्याचेही कौतुक यावेळी करण्यात आले. 

Pune Rain:पुण्यात आज काय घडतंय? परीक्षा पुढे ढकलल्या, महापालिकेची हेल्पलाईन सुरू

उर्मट होती आणि पिलेली पण...पहाटे अडीचच्या सुमारास वरील दोघांना वाचवायला गेलेल्या शिक्रापूर पोलिसांना सुरवातीला आर्वाच्च भाषेत बोलत वरील दोघांनी चांगलीच खरडपट्टी केली. जबरदस्तीने कंबरेला दोरी बांधून तब्बल दिड तासाच्या या रेस्क्यू ऑपरेशननंतर मात्र दोघांनीही अक्षरश: पाया पडून पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार, ढमाळ व सर्वच पोलिसांनी माफी मागितली.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार) 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #PuneRains : Constable Dhamal Saved the lives of two civilians who were swept away by the floods