#PuneRains : इंदापूर तालुक्यातील कळाशी व गंगावळण गावातील रस्ता खचला

डॉ. संदेश शहा
Thursday, 15 October 2020

इंदापूर तालुक्यातील कळाशी व गंगावळण या दोन गावातील रस्ता खचल्याने या रस्त्यावरून होणारी चारचाकी व ट्रॅक्टर वाहतूक बंद पडली आहे.

इंदापूर :  बुधवार 14 ऑक्टोबर रोजी पडलेल्या प्रचंड पावसामुळे उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील इंदापूर तालुक्यातील कळाशी व गंगावळण या दोन गावातील रस्ता खचल्याने या रस्त्यावरून होणारी चारचाकी व ट्रॅक्टर वाहतूक बंद पडली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बिजवडी येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना, वरकुटे बुद्रुक येथील सोनाई कृषी प्रकिया कारखाना, शेट फळ गढे येथील बारामती ऍग्रो साखर कार खाना तसेच इतर कारखान्यांना या रस्त्याने ऊस वाहतूक होते. कारखाने नुकतेच सुरू होणार असल्याने ऊस तोडणी कामगार आले आहेत. त्यामुळे हा खचलेला रस्ता तातडीने दुरुस्त होणे गरजेचे आहे.

दरम्यान, वरकुटे बुद्रुक येथील दलितवस्तीतील घरामध्ये पाणी घुसल्याने त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. पोलीस पाटील पल्लवी संदेश देवकर, निलचंद देवकर व रवींद्र देवकर यांनी त्यांच्या जेवणाची मदत केली. करेवाडी ते बनकर वस्ती, राजवडी ते कालठण या रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेले असल्याने या भागाचा संपर्क तुटला आहे.

Pune Rain:पुण्यात आज काय घडतंय? परीक्षा पुढे ढकलल्या, महापालिकेची हेल्पलाईन सुरू

कळाशी व गंगावळण भागातपावसाचा उसाला व केळी बागांना फटका बसला आहे. त्यामुळे त्याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी असे आवाहन कळा शीचे सरपंच नामदेव करे व गंगावळण येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष
महारुद्र पाटील यांनी केले आहे.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #PuneRains : Road damage in Kalashi and Gangavalan villages in Indapur taluka