esakal | 'या' डॉक्टरांचा सल्ला ऐकाल, तर तुम्हीही व्हाल कोरोनामुक्त
sakal

बोलून बातमी शोधा

'या' डॉक्टरांचा सल्ला ऐकाल, तर तुम्हीही व्हाल कोरोनामुक्त
  • रुग्णांना देत असलेला सल्ला स्वतः अवलंबला
  • डॉक्टरची कोरोनावर मात 

'या' डॉक्टरांचा सल्ला ऐकाल, तर तुम्हीही व्हाल कोरोनामुक्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपला जीव धोक्यात घालून कोविड-19 चा मुकाबला करणारे कोरोना योद्धे देखील बाधित झाले आहेत. शस्त्रक्रियेला आलेल्या रुग्णांना तपासताना एक डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह झाले. कोरोनाला घाबरू नका प्रबळ इच्छाशक्ती आणि योग्य उपचार मिळाले तर तो बरा होतो, असा रुग्णांना देण्यात येणारा सल्ला त्यांनी स्वतः अमलात आणला आणि कोरोनावर मात केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

नंदकिशोर बोरसे असे या डॉक्टरांचे नाव आहे. 58 वर्षीय डॉ. बोरसे हे शेठ ताराचंद रामनाथ रुग्णालयात सर्जरी विभागाचे प्रमुख आहेत. विविध आजारांच्या शस्त्रक्रियेसाठी आलेल्या रुग्णांच्या माध्यमातून त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर त्यांच्या घरातही कोरोनाने शिरकाव केला. त्यांची 52 वर्षीय पत्नी आणि 23 वर्षांची मुलगी कोरोना पॉझिटिव्ह आढळली. डॉ. बोरसे यांना कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. मात्र, मुलीला थोडासा त्रास जाणवू लागल्याने त्यांनी टेस्ट केली होती. या बाबत डॉ. बोरसे यांनी सांगितले की, कोरोनाचे टेन्शन घेऊ नका, तो बरा होऊ शकतो, असा सल्ला मी माझ्या रुग्णांना देत होतो. इतरांना करीत असलेले मार्गदर्शनच मी माझ्या बाबतीत अवलंबले. तसेच, मुलगी वैद्यकीय शिक्षण घेत असल्याने ती देखील या आजाराला घाबरली नाही.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मनात कोणतेही वाईट विचार येऊ न देता व घाबरून न जाता उपचार घेत होतो. आपल्याला जर एखादा आजार जडला असेल व त्यात आपण मानसिकदृष्ट्या खचत गेलो, तर त्या आजारावर मात करणे थोडे मुश्किल होते. मात्र आपण सकारात्मक विचार केला. त्याला योगा आणि व्यायामाची जोड दिली व डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी अगदी तंतोतंत पाळल्या, तर कोरोनाला हरवणे अगदी सोपे आहे. ऍलोपॅथीसह आम्ही तिघांनीही श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय व रिसर्च सेंटरच्या माधव रसायन आयुर्वेदिक गोळ्यांचा कोर्स पूर्ण केला. आता खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही केवळ गरजेचीच शस्त्रक्रिया करतो. ती करण्यापूर्वी रुग्णांना कोरोनाची टेस्ट करून घेण्याचा सल्ला देत आहोत.
 
सकारात्मक विचारही गुणकारी औषध 

एक डॉक्टर आणि कोरोनतून बरा झालेला रुग्ण म्हणून माझा सल्ला आहे की, कोरोना झाल्यावर घाबरून जाऊ नका आणि कोणत्याही वाईट गोष्टी मनात आणू नका. त्यासाठी योगा, प्रार्थना किंवा मनाची मशागत करणार्‍या कोणत्याही गोष्टी करा. कारण सकारात्मक विचार हे देखील मोठे गुणकारी औषध आहे. तसेच, पूर्ण बरे झाल्यानंतर प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे या, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Edited by : Shivnandan Baviskar

loading image
go to top