Pune Ring Road: पुणेकरांना मोठा दिलासा! HCMTR आणि PMRDA रिंग रोड प्रकल्पांना वेग; 20 दिवसांत भूसंपादन प्रस्ताव सादर करण्याचे आदेश

PMRDA Ring Road project 44 villages: एचसीएमटीआर व पीएमआरडीए रिंग रोडसाठी २० दिवसांत भूसंपादन प्रस्ताव सादर करण्याचे आदेश; सुधारित आराखड्यामुळे खासगी जमिनींचे संपादन केवळ २५ टक्क्यांवर, विद्यमान रस्त्यांचा ४० टक्के वापर
Big Relief for Pune Commuters as HCMTR and Ring Road Projects Fast-Tracked

Big Relief for Pune Commuters as HCMTR and Ring Road Projects Fast-Tracked

sakal

Updated on

पुणे : पुणे महानगर प्रदेशातील (पीएमआर) वाढती वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महत्त्वाकांक्षी उच्च क्षमता द्रुतगती वाहतूक मार्ग (एचएमसीआरटी) आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए ) अंतर्गत वर्तुळाकार मार्ग (रिंग रोड) या प्रकल्पांच्या अंमलबजावणीला गती देण्यात येणार आहे. संबंधित प्रकल्प गतीने मार्गी लागावेत, यासाठी २० दिवसात भूसंपादन प्रस्ताव सादर करा, असे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी बैठकीत दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com