
Pune Municipal Corporation
Sakal
पुणे : महापालिकेच्या रुग्णालयांत वर्ग एक ते चार मिळून एक हजार ७८३ पदे मंजूर आहेत. त्यापैकी केवळ एक हजार १६० पदांवर मनुष्यबळ कार्यरत असून, उर्वरित ६३५ पदे रिक्त आहेत. त्यामध्ये आरोग्य सेवेतील केंद्रबिंदू असलेल्या डॉक्टरांच्या १४५ पदांपैकी फक्त ३९ पदांवर हे डॉक्टर व अधिकारी कार्यरत असून तब्बल १०६ पदे रिक्त आहेत. त्यामुळे महापालिकेची आरोग्यसेवाच ‘आजारी’ पडल्याचे दिसून येत आहे.