double decker bus
sakal
पुणे - पीएमपी प्रशासनाने २५ डबलडेकर बसची निविदा काढली आहे. भाडेतत्त्वावरील या बस पूर्णतः इलेक्ट्रिक व वातानुकूलित असतील. काही दिवसांपूर्वी पुण्यातील विविध भागांत या बसची चाचणी झाली होती. ती यशस्वी झाल्यानंतर निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. एप्रिल-मे महिन्यात म्हणजेच येत्या उन्हाळ्यात पुणेकरांना डबलडेकरचा प्रवास घडण्याची शक्यता आहे.