
पुणे : केंद्र शासनाच्या आदेशानुसार पुणे महापालिकेत आज युद्धकाळात काळजी कशी घ्यावी यासाठी मॉकड्रील करण्यात आले. पण सायरन नसणे, वॉकिटॉकी नसणे, इमारतीतील अग्निशामन यंत्रणा सुरु नसणे अशा त्रुटी दिसून आल्या. सायरन नसल्याने रुग्णवाहिका व अग्निशामक दलाच्या गाड्यांचा सायरनचा वापर यावेळी करण्यात आला.