एनसीसी ‘इंटर ग्रुप फायरिंग’ स्पर्धेत पुण्याचा डंका

पुण्याला सर्वसाधारण विजेतेपद
इंटर ग्रुप फायरिंग
इंटर ग्रुप फायरिंगsakal

पुणे : राज्यातील एनसीसीच्या सात ग्रुपमध्ये झालेल्या 'इंटर ग्रुप फायरिंग' स्पर्धेमध्ये पुणे एनसीसी ग्रुपने सर्वोत्तम कामगिरी करत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. तर मुंबईच्या एनसीसी ‘बी ग्रुप’ला उपविजेते पद मिळाले आहे.

इंटर ग्रुप फायरिंग
मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीला विशेष अधिकार दिलेत का? चित्रा वाघ यांचा सवाल

पुणे एनसीसी मुख्यालयात १ ते ५ सप्टेंबर या कालावधीत ही स्पर्धा संपन्न झाली. यामध्ये राज्यातील १४० कॅडेट्सने सहभाग घेतला होता. तर सहभागी झालेल्या कॅडेट्सपैकी बारा खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेसाठी म्हणजेच ‘इंटर डायरेक्ट फायरिंग’ स्पर्धेसाठी निवडण्यात आले. तर या स्पर्धेचा समारोप आणि पारितोषिक वितरण सोहळा रविवारी संपन्न झाला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे ब्रिगेडीयर आर के गायकवाड यांच्या हस्ते पुणे एनसीस ग्रुपला चषक प्रदान करण्यात आला. यावेळी या स्पर्धेचे मुख्य समन्वयक कर्नल एस शिंदे, कर्नल अनिरुद्ध वाले यांच्यासह एनसीसी कॅडेट्सचे प्रशिक्षक सुभेदार सुरेंद्र सिंग, हवालदार राजबीर सिंग, हवलदार लखविंदर सिंग, शस्त्र प्रशिक्षक अरुण वर्मा आदी उपस्थित होते.

इंटर ग्रुप फायरिंग
पुणे : खर्च केला पण, आम्हाला नाही कळला? नागरिकांचा सवाल

या स्पर्धेत पुण्यातील समिधी चव्हाण (स. प महाविद्यालय) आणि सुनील कांबळे (डी टी पाटील जुनिअर कॉलेज) या एनसीसी कॅडेट्सला ‘सर्वोत्तम फायर्स’ हा किताब मिळाला आहे. तर राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंचे सराव शिबिर सोमवारपासून (ता. ६) बालेवाडी स्टेडियम येथे होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com