Pune Real Estate Market: पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी. पुणे आता भारतातील प्रमुख रिअल इस्टेट केंद्र म्हणून आपले स्थान बळकट करत आहे. या क्षेत्राने ज्या झपाट्याने प्रगती केली, त्याने अनेकांना आश्चर्यचकित केले आहे. 2024 च्या पहिल्या तिमाहीत (Q1) दाखवलेल्या मजबूत कामगिरीने वर्षभर उंची गाठली.
वर्षअखेरच्या आकडेवारीत 15% वार्षिक वाढ (YoY) विक्रीत नोंदवली गेली, तर ऑक्टोबरमध्ये मालमत्तेच्या नोंदणीमध्ये 39% वार्षिक वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
भारतातील प्रमुख शहरांतील एकूण गृहविक्रीत पुण्याचा 18% वाटा असून, ज्यामुळे देशाच्या रिअल इस्टेट बाजारात पुण्याचे वाढते महत्त्व अधोरेखित होते.