
Sinhgad Road Flood
Sakal
पुणे : पावसाळ्यात नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील (सिंहगड रस्ता) सोसायट्यांना पूरस्थितीपासून संरक्षित करण्यासाठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्प राबविण्याचे महापालिकेने निश्चित केले होते. त्यासाठी सरकारकडून मिळणाऱ्या निधीकडे महापालिकेचे डोळे लागले होते. मात्र आता महापालिकेच्या पातळीवरच निधीची तरतूद करून हा प्रकल्प राबविण्याचे महापालिकेने निश्चित केले आहे.