पुणे : मौजमजेसाठी ते चोरायचे स्पोर्ट बाईक; तिघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 डिसेंबर 2019

  •  सिंहगड रस्ता पोलिसांची कामगिरी
  •  दहा स्पोर्टस बाईक हस्तगत

धायरी : पुणे शहरासह उपनगरांतील विविध भागात महागड्या स्पोर्टस बाईक चोरणाऱ्या तीन तरुणांना सिंहगड रस्ता पोलिसांनी परभणी व बीड जिल्ह्यात अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 10 स्पोर्टस बाईक हस्तगत केल्या आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा, ई-सकाळचे ऍप

शुभम राजेंद्र राठोड (वय 21, रा. सिद्धिविनायक सोसायटी, फ्लॅट नं. 11, जांभूळवाडी, आंबेगाव), आकाश कैलास देवकाते (वय 24, रा. आंबेगाव) व आकाश ऊर्फ अंश दत्तमिलन घिरटकर (वय 20, रा. ऍक्‍टिव्ह फाउंडेशन बिल्डिंग, जांभूळवाडी, आंबेगाव) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. ते मौजमजेसाठी गाड्या चोरत असल्याचे उघडकीस आले आहे.

अजित पवार म्हणतात एकमत होत नसेल तर सर्वांनी राजीनामे द्या 

गेल्या काही दिवसांपासून सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाहनचोरांनी धुमाकूळ घातला होता. दहा दिवसांत सहा दुचाकी गायब झाल्या होत्या. त्यामुळे स्थानिक रहिवासी हतबल झाले होते. काही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज मिळूनही चोर सापडत नव्हते. त्यामुळे सिंहगड रस्ता तपास पथकाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांसमोर वाहनचोर शोधण्याचे आव्हान निर्माण झाले होते.

शिवसेना पुन्हा भाजपसोबत; केले बाजूने मतदान

दरम्यान, पोलिस कर्मचारी श्रीकांत दगडे व पुरुषोत्तम गुन्ला यांना मिळालेल्या माहितीवरून तसेच सीसीटीव्हीच्या आधारे तिघेजण परभणी व बीडमध्ये असल्याचे समजले. त्यानंतर पोलिस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, वरिष्ठ निरीक्षक नंदकिशोर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक चेतन थोरबोले, उपनिरीक्षक सुधीर घाडगे, कर्मचारी दत्ता सोनवणे, हरीश गायकवाड, दयानंद तेलंगे पाटील, सचिन माळवे, रफिक नदाफ, योगेश झेंडे, बालाजी जाधव, किशोर शिंदे यांनी वाहनचोरांना बीड व परभणी येथे अटक केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: punes three Bike Thief arrested in Parabhani and beed district