Pune Traffic : पुण्यातील पादचारी मार्ग छोटे करणार, महापालिकेचा निर्णय; वाहतूक कोंडी फोडण्यासाठी विविध उपाययोजना

Pune Update : पुण्यात ३२ प्रमुख रस्ते आणि २२ चौकांवरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महापालिका व पोलीस प्रशासनाने तातडीची कामे हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
Pune Traffic

Pune Traffic

Sakal

Updated on

पुणे : शहरातील प्रमुख ३२ रस्ते आणि २२ चौकांत वाहतूक कोंडी होत असल्याबद्दल महापालिका प्रशासनाने माहिती संकलित केली आहे. त्यावर आज वाहतूक पोलिसांसोबत झालेल्या बैठकीत एका महिन्यात त्वरित होणारी कामे पूर्ण करून रस्ते मोठे व अडथळा मुक्त करण्याचा निर्णय झाला आहे. तसेच पादचारी मार्ग लहान करणे, जागा ताब्यात घेणे अशा प्रकारच्या कामांना वेळ लागणार असल्याचे पथ विभागप्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com