esakal | पुणे-सातारा रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात, पोलिस व महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे-सातारा रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात

पुणे-सातारा रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

खेड-शिवापूर : पुणे-सातारा रस्त्यावर भोर आणि हवेली तालुक्याच्या हद्दीवरील सातारा बाजूकडील सेवा रस्ता हॉटेलांचे फलक आणि चहाच्या टपऱ्या यांनी खाऊन टाकला आहे. त्यामुळे याठिकाणी वाहनचालकांचा गोंधळ उडत असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. तरीही महामार्ग पोलिस आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रिलायन्स इन्फ्रा त्याकडे दुर्लक्ष करत आहेत.

पुणे-सातारा रस्त्यावर सातारा बाजूकडील रस्त्यावरील भोर आणि हवेली तालुक्याच्या हद्दीवरील सुमारे अर्धा किलोमीटरचा सेवा रस्ता अतिक्रमणांच्या विळख्यात सापडला आहे. दिवसा याठिकाणी हॉटेलांचे फलक आणि वाहने उभी असतात. तर रात्रभर याच सेवा रस्त्यावर चहाच्या टपऱ्या सुरू असतात. त्यामुळे याठिकाणी वाहन चालकांचा गोंधळ उडत असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

रात्रीच्या वेळी तर येथील चहा टपरीवर चहा पिण्यासाठी थांबलेले प्रवासी मुख्य रस्त्यावर वाहने उभी करतात. त्यामुळे याठिकाणी धोकादायक परिस्थिती निर्माण होते. तरीही या धोकादायक परिस्थितीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महामार्ग पोलिस सोईस्कर दुर्लक्ष करत आहे. वाहतुकीस अडथळा ठरणारी येथील सेवा रस्त्यावरील ही अतिक्रमणे वेळीच हटवली नाही, तर याठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता नागरीक व्यक्त करत आहेत.

हेही वाचा: वीजबील थकबाकीची वसुली न झाल्यास राज्य अंधारात जाईल - नितिन राऊत

कोंढणपूर फाट्यावरील उड्डाणपूल आणि पाठीमागील सेवा रस्ता यादरम्यान दुभाजक बनविण्यासाठी येथील सुमारे अर्धा किलोमीटरचा रस्ता उखडण्यात आला आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून हा उकरलेला रस्ता तसाच आहे. याठिकाणी अनेक दुचाकी वाहने घसरून अपघात झाले आहेत. तरीही याठिकाणी दुभाजक बनविण्याचे काम अजूनही पूर्ण करण्यात येत नाही. तसेच अनेक ठिकाणी हॉटेल चालकांनी मुख्य रस्ता आणि सेवा रस्ता यामधील दुभाजक फोडले आहेत. तसेच येथील पावसाचे पाणी वाहून जाणारे चर बुजवून रस्ता तयार केला आहे. त्यामुळे याठिकाणी अपघातास निमंत्रण मिळत आहे. तरीही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रिलायन्स इन्फ्रा त्याकडे दुर्लक्ष करत आहेत.

हेही वाचा: वर्धा नदीत नाव उलटून ११ जण बुडाले, तिघांचे मृतदेह सापडले

तर याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पेट्रोलिंग पथकाशी संपर्क साधला असता आम्ही कारवाई करत आहोत. मात्र महामार्ग पोलिसांनी पण सहकार्य करायला हवे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

loading image
go to top