Police Act Swiftly, Accused Sent to Yerwada Jail
Sakal
शिरूर : माझ्या एरियात काम करायचे असेल तर दोन लाख रूपये द्यावे लागतील, अशी मागणी करून शासकीय बांधकाम कंत्राटदारास व त्याच्या कामगारांस हातपाय तोडण्याची धमकी देत शिवीगाळ करणाऱ्या अभिषेक हनुमान मिसाळ उर्फ घ्या (रा. सोनार आळी, शिरूर) याला पोलिसांनी अटक केली. तो तडीपार गुंड असून, त्याची येरवडा कारागृहात रवाणगी करण्यात आली आहे.