#PuneTheatre नेहरू भवनात सोयीसुविधांची वानवा

सुवर्णा चव्हाण
शनिवार, 9 जून 2018

मी मध्यतंरी प्रदर्शन पाहण्यासाठी राजा रविवर्मा आर्ट गॅलरीत गेलो होतो. येथील वातानुकूलन यंत्रणा बंद असण्यासह स्वच्छतागृहाची स्थितीही चांगली नव्हती. तसेच कलादालनातील दिवे चांगल्या स्थितीत नव्हते. 
- सुमित चडचणकर, प्रेक्षक

पुणे - ‘‘महापालिकेने घोले रस्त्यावर पं. नेहरू सांस्कृतिक भवन बांधले. मात्र तेथे नाटकांचे प्रयोगच होत नाहीत. विविध संस्थांचे सांस्कृतिक कार्यक्रम हीच भवनाची ओळख राहिली आहे. आतील कलादालनात प्रदर्शने भरतात. मात्र येथे मिळणाऱ्या सोयीसुविधा अपुऱ्या असून, स्वच्छतागृह नेहमीच अस्वच्छ असते. वस्तुतः छोटेखानी कार्यक्रम, नाटकांसाठी भवन बांधूनसुद्धा कलाकार, संयोजकांच्या दृष्टीने सोयीचे असले तरीही प्रतिसाद फारसा मिळत नाही,’’ नाट्य निर्मात्या भाग्यश्री देसाई यांनी त्यांचा अनुभव सांगितला. 

पं. नेहरू सांस्कृतिक भवनात जुनाट दिवे, तुटलेल्या फरश्‍या पाहायला मिळतात. या भवनाची इमारत तीन मजली आहे. तळमजल्यावर व्यवस्थापकांची खोली आणि प्रदर्शनासाठीची जागा आहे. पहिल्या मजल्यावर सभागृहासह राजा रविवर्मा आर्ट गॅलरी आहे. दुसऱ्या मजल्यावर पुणे स्मार्ट सिटीचे कार्यालय, कॉन्फरन्स हॉल आहे; परंतु माहिती फलकात नाव असूनही ‘साने गुरुजी ग्रंथालय’ अद्याप सुरू होऊ शकलेले नाही. वातानुकूलन यंत्रणा अधूनमधून बंद असते. आसन क्षमता मर्यादित असल्याने येथे व्यावसायिक नाटके होत नाहीत.

मी मध्यतंरी प्रदर्शन पाहण्यासाठी राजा रविवर्मा आर्ट गॅलरीत गेलो होतो. येथील वातानुकूलन यंत्रणा बंद असण्यासह स्वच्छतागृहाची स्थितीही चांगली नव्हती. तसेच कलादालनातील दिवे चांगल्या स्थितीत नव्हते. 
- सुमित चडचणकर, प्रेक्षक

Web Title: #PuneTheatre Pandit Jawaharlal Nehru Sanskrutik Bhavan