थकीत विजबिल वसुलीच्या कामात अडथळा आणाल, तर सावधान... 

जनार्दन दांडगे
Tuesday, 23 February 2021

थकीत विजबिल वसुलीच्या कामात यापुढील काळात अडथळा आणाल तर सावधान, थकीत विजबिल वसुलीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यास दमबाजी अथवा मारहाण कराल तर आपणास, रोख रकमेच्या दंडासह तिन ते पाच वर्षाची जेलही होऊ शकते.

लोणी काळभोर (पुणे) : थकीत विजबिल वसुलीच्या कामात यापुढील काळात अडथळा आणाल तर सावधान, थकीत विजबिल वसुलीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यास दमबाजी अथवा मारहाण कराल तर आपणास, रोख रकमेच्या दंडासह तिन ते पाच वर्षाची जेलही होऊ शकते. थकीत विजबिल वसुलीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यास दमबाजी केल्याबद्दल कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील एका हॉटेल चालकाच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

पुणेकरांनो, रात्री घराबाहेर पडताय, मग ही बातमी नक्की वाचा

अविनाश ज्ञानोबा ताम्हाणे (रा. ताम्हाणेवस्ती, कुंजीरवाडी, ता. हवेली) असे गुन्हा दाखल झालेल्या हॉटेल चालकाचे नाव  आहे. या प्रकरणी संपत शिवराम चौधरी (वय ५८, रा. कवडीपाट माळवाडी, कदमवाकवस्ती, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलिसांनी अविनाश ताम्हाणे याच्या विरोधात  गुन्हा दाखल केला आहे. अविनाश ताम्हाणे याच्या मालकिच्या हॉटेलचे थकीत विज बिल वसुलीसाठी संपत चौधरी व त्यांचे सहकारी मंगळवारी (ता. २३) सकाळी गेले असता, वरील प्रकार घडला आहे.

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संपत चौधरी हे महावितरण कंपनीमध्ये वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून थेऊर (ता. हवेली ) येथील कार्यालयात काम करतात. तर अविनाश ताम्हाने हे थेऊर फाट्यावर जयभवानी नावाचे हॉटेल चालवतात. मागील वर्षभरापासून ताम्हाणे यांच्या हॉटेलचे विजबिल थकल्याने, मंगळवारी सकाळी विज वितरण कंपनीच्या थेऊर कार्यालयांमधील कनिष्ठ अभियंता सुरेश माने किरण झेंडे व संपत चौधरी व त्यांचे सहकारी विजबिल वसुलीसाठी तुळजाभवानी हॉटेलवर गेले होते. यावेळी संपत चौधरी यांनी ताम्हाणे यांच्याकडे विजबिल भरण्याबाबत चर्चा सुरु केली असता, ताम्हणे यांनी संपत चौधऱी यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच संपत चौधरी त्यांच्या खांद्याला हात लावून मागे सारत अंगाभोवती झटापट करण्यास सुरुवात केली. तसेच ताम्हाणे यांनी संपत चौधरी यांना बदली करण्याचीही धमकी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान याही परीस्थितीत संपत चौधरी यांनी ताम्हाणे यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता, ताम्हाणे यांनी संपत चौधरी यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. ताम्हाणे यांच्या हॉटेलजवलळ स्थानिक लोक जमत असल्याचे दिसताच, आणखी गोंधळ नको म्हणुन चौधरी व त्यांचे सहकारी घटनास्थावरुन निघून गेले. व त्यानंतर लोणी काळभोर पोलिसांत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी ताम्हाणे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास साहय्यक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे करीत आहेत.

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: punishment can be meted out if you obstruct the recovery of overdue electricity bill