esakal | अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्‍यास शिक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

Pune : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्‍यास शिक्षा

Pune : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्‍यास शिक्षा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : मैत्रिणीसोबत सोसायटीमधील पार्किंगमध्ये खेळत असलेल्या ११ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्‍यास न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश के. के. जहागीरदार यांनी हा निकाल दिला.

लखन पेरियार याला शिक्षा सुनावली आहे. २६ फेब्रुवारी २०२० रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास धानोरी परिसरात हा प्रकार घडला होता. याबाबत मुलीच्या आईने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. खटल्याचे कामकाज सरकार पक्षातर्फे अरूंधती ब्रम्हे यांनी पाहिले. यात पाच साक्षीदार तपासले. त्यात संबंधित मुलगी व तिच्या आईची साक्ष महत्त्वाची ठरली.

गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक सचिन निकम यांनी केला. पैरवी अधिकारी म्हणून सतीश जाधव यांनी कामकाज पाहिले. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त एक वर्षाचा कारावास भोगावा लागेल. तसेच, दंडाची रक्कम पिडितेला द्यावी, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.

loading image
go to top