
सिद्धू मुसेवालाची हत्या करणाऱ्या दोन जणांविरुद्ध लुकआऊट नोटीस पाठवण्यात आलीये
सिद्धू मूसेवालाला गोळ्या घालणारे दोघे जण पुण्यातले, पोलीस 'अॅक्शन मोड'मध्ये
प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाल यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर ही हत्या कोणी केली याचा शोध सुरु असताना आता एक मोठी बातमी समोर येत आहे. गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणा आता पुण्यातून कनेक्शन असल्याची माहिती मिळत आहे. सिद्धू मुसेवालाची हत्या करणाऱ्या दोन जणांविरुद्ध लुकआऊट नोटीस पाठवण्यात आली आहे. सौरभ महांकाळ आणि संतोष जाधव अशी संशयीतांची नावे असून हे दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे समजते आहे. (crime news pune)
हेही वाचा: अरब देशातील कचराकुंडीवर मोदींचा फोटो, राजकारण तापलं
पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवालाची 29 मे रोजी पंजाबमधील मानसा जिल्ह्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येपाठीमागे काय गुपित आहे. हत्या कोणी केली याचा शोध सुरु असताना आता हे कनेक्शन पुण्यातून असल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी दोघांना लुकआऊट नोटीस पाठवण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष जाधव मंचरचा सराईत गुन्हेगार आहे. ओंकार उर्फ रानिया बाणखेलेच्या खून प्रकरणात संतोष जाधव फरार असून पुणे गुन्हे शाखेकडून त्याचा शोध सुरु आहे. हे दोघेही लॉरेन्स बिष्णोईच्या टोळीतील असल्याचे समोर आले आहे. मुसेवालाची हत्या करण्यासाठी चार राज्यातून शुटर्स पंजाबमध्ये पाठवण्यात आले होते. 3 शूटर्स पंजाबमधून, 2 महाराष्ट्रातून, 2 हरियाणातून आणि यातील एक शूटर्स हा राजस्थानचा होता असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, पुणे ग्रामीण पोलिसांनी पंजाब पोलिसांना सीसीटिव्ही फूटेज पाहून संतोष जाधव याच्याबद्दल दिली होती.
हेही वाचा: NCPला मुख्यमंत्रीपदाची आशा? मुंडेंच्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Web Title: Punjabi Singer Sidhu Moose Wala Murder Case Pune Connection Two People Found Police
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..