पुण्यभूषणच्या उपक्रमांचे जगभर अनुकरण : देसाई

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 मे 2018

कोथरूड : नावीन्यपूर्ण संकल्पना, टीम वर्क, सातत्य या जोरावर पुण्यभूषण फाउंडेशनने अनेक उपक्रम यशस्वी केले. जगभर त्याचे अनुकरण झाले, असे प्रतिपादन "पुण्यभूषण फाउंडेशन'चे संस्थापक डॉ. सतीश देसाई यांनी केले. 

"सिनर्जी हॉलिडे व्हिले' आणि "सिनर्जी फाउंडेशन' यांच्या वतीने सामाजिक, सांस्कृतिक योगदानाबद्दल डॉ. देसाई यांचा सत्कार करण्यात आला. सिनर्जीचे संचालक राजेंद्र आवटे, मंदार देवगावकर, गणेश जाधव यांच्या हस्ते हा सत्कार झाला. 
"सिनर्जी संवाद' या उपक्रमांतर्गत झालेले हे दुसरे संवाद पुष्प होते. या वेळी डॉ. देसाई यांनी "पुण्यभूषणचे दिवस' या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला. 

डॉ. देसाई म्हणाले, "स्वातंत्र्यसैनिकांची आठवण चिरंतन ठेवण्यासाठी "त्रिदल' संस्थेची स्थापना झाली, तर स्वातंत्र्योत्तर पिढीच्या योगदानाची दखल घेण्यासाठी एस. एम. जोशी यांच्या प्रेरणेने "पुण्यभूषण फाउंडेशन'ची स्थापना झाली. पहिला "पुण्यभूषण पुरस्कार' भीमसेन जोशी यांना देण्यात आला. आता हा पुरस्कार जगद्विख्यात झाला असून, गावोगावी त्याचे अनुकरण सुरू आहे. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी पुण्यभूषण कार्यक्रमाला आल्यावर त्यांच्या पुढाकाराने "महाराष्ट्र भूषण पुरस्कार' सुरू झाला.

"पुण्यभूषण' परंपरेला आता 30 वर्षे पूर्ण झाली. उपराष्ट्रपती, राष्ट्रपतीदेखील या पुरस्कार वितरण कार्यक्रमाला पाहुणे म्हणून येऊन गेले आहेत. ही एकमेवद्वितीय घटना आहे. "आम्ही जे करू, ते उत्तम करू आणि जगभर अनुकरण होईल, असे करू,' या ध्यासातूनच पुण्यभूषण पुरस्कारानंतर पुढे "पुण्यभूषण पहाट दिवाळी', "पुण्यभूषण दिवाळी अंक' हे उपक्रम सुरू झाले. "पहाट दिवाळी'चे जगभर अनुकरण झाले, तर "पुण्यभूषण' हा शहराला वाहिलेला अनोखा संग्राह्य दिवाळी अंक ठरला. हा अंक दरवर्षी पुरस्कार मिळवत असतो.

आम्ही सर्व जण कार्यकर्ते म्हणून पुण्यभूषण टीममध्ये काम करतो. आमच्याकडे पदाधिकारी नाहीत. रसिकांच्या अंतःकरणात आम्ही घर केले आणि अजोड अशी विश्‍वासार्हता मिळविली, असेही डॉ. देसाई म्हणाले. पु. ल. देशपांडे जन्मशताब्दीनिमित्त आगामी वर्षात 5 खंडांत 53 शहरांत होणाऱ्या "ग्लोबल पुलोत्सव' उपक्रमाची माहितीही त्यांनी दिली. दीपक बिडकर यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र आवटे यांनी आभार मानले

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Punyabhushan Award of world renovation