Cyber Fraud Targeting Senior Citizens in Pune
पुणे : सायबर चोरट्यांनी पोलिस असल्याचे भासवून एका ज्येष्ठ नागरिकाला पोर्नोग्राफी करीत असल्याची भीती दाखवून ३६ लाख रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार धायरीतील डीएसके विश्व परिसरात घडला. याप्रकरणी नांदेड सिटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत धायरीतील एका ७९ वर्षीय ज्येष्ठ व्यक्तीने फिर्याद दिली आहे.