
Purandar Airport
Sakal
पुणे : ‘‘पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी जमीन देण्यास शेतकरी स्वतःहून पुढे येत आहेत. मागील १८ दिवसांत विमानतळ होणाऱ्या सात गावांमधील एक हजार ९८० शेतकऱ्यांनी सुमारे दोन हजार ३० एकर क्षेत्रासाठी संमतिपत्रे जिल्हा प्रशासनाकडे दिली आहेत. एकूण क्षेत्राचा विचार करता, तब्बल ७२ टक्के क्षेत्राची संमती जिल्हा प्रशासनाला मिळाली आहे,’’ अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.