

पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. सात गावांमधील एकूण १२१६ हेक्टर जमीन आणि अतिरिक्त २४२ एकर जमीन घेण्यात येणार आहे. जमिनींचे संपूर्ण अधिग्रहण होताच विमानतळाचे काम ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.