

Purandar Airport Land Acquisition High Court Rejects Farmers Plea Seeking Change In Proposed Airport Location
sakal
पुणे : पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनाला विरोध करणारी व विमानतळाची जागा बदलण्याची मागणी करणारी शेतकऱ्यांची याचिका उच्च न्यायालयाने मंगळवारी (ता. २२) फेटाळली. जागेची निश्चिती करणे हा सर्वस्वी तांत्रिक तज्ज्ञांच्या अखत्यारीतील विषय व राज्य सरकारच्या धोरणाचा भाग आहे. राज्याच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी न्यायालय हे तज्ज्ञ प्राधिकरण नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.