
Purandar Airport
Sakal
पुणे : पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी ९३ टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांनी संमतिपत्रे सादर केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने पुढील प्रक्रिया सुरू केली आहे. विमानतळासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमीन मोजणीला प्रशासनाने शुक्रवारपासून (ता. २६) सुरुवात केली. पहिल्याच दिवशी ५० हेक्टरहून अधिक जमिनींची मोजणी केल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.