
Purandar Airport Land Scam
Sakal
पुणे : पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळामुळे त्या परिसरातील जमिनींना सोन्याचे दर मिळू लागल्याने काही जणांनी बनावट कागदपत्रे तयार करून जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रस्तावित विमानतळ परिसरातील मागील पाच वर्षांतील सर्व जमीन व्यवहारांची तपासणी करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. या तपासणीत आढळणाऱ्या दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.