
Purandar Airport
Sakal
पुणे : पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी संमतिपत्रे सादर करण्यासाठी दिलेली वाढीव मुदत गुरुवारी संपली. या मुदतीत एकूण तीन हजार एकर क्षेत्रापैकी आजअखेर २ हजार ८१० एकर जागेची संमत्तीपत्रे जिल्हा प्रशासनाकडे सादर झाली आहेत. त्यामुळे एकूण भूसंपादनाच्या ९३ टक्क्यांहून अधिक जागेची संमतिपत्रे दाखल झाल्याने विमानतळाचे काम सुरू करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल पडले असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, आता संमतिपत्रे सादर करण्यास मुदत दिली जाणार नसल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.