Purandar Airport : शेतकऱ्यांनी घेतली शरद पवार यांची भेट; पुरंदर विमानतळाबाबत मांडले म्हणणे
Sharad Pawar : पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी होणाऱ्या भूसंपादनावर हरकती नोंदवलेल्या शेतकऱ्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन मोबदला व पुनर्वसनाच्या मागण्या मांडल्या.
पुणे : पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पातील भूसंपादनाच्या संदर्भात शेतकऱ्यांनी ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची शनिवारी (ता. १६) भेट घेतली. पवार यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि साधारण तासभर त्यांच्याशी चर्चा केली.