
Pune Latest News: पुरंदर येथे होत असलेल्या नियोजित विमानतळाला स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. शनिवारी शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. त्यानंतर आता सरकारने पुरंदर विमानतळाच्या बाबतीत होणारं सर्व्हेक्षण थांबवलं आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतची माहिती दिली.