
Purandar Airport
Sakal
पुणे : पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी संपादित करण्यात येणाऱ्या तीन हजार एकर जमिनीवर टर्मिनल आणि दोन धावपट्ट्यांसाठी पूर्वीच्या आराखड्यानुसारच सुमारे दोन हजार २०० एकर जमीन कायम ठेवली आहे. त्यामुळे क्षेत्रफळानुसार देशातील दुसरे, तर राज्यातील सर्वांत मोठे विमानतळ ठरणार आहे. मालाच्या साठवणुकीपासून वाहतूक सुविधा देण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या लॉजिस्टिक हबच्या जागेत कपात केली आहे.