Cm Devendra Fadnavis Pune Airport
sakal
पुणे - पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी आवश्यक असणारा निधी उभारण्याकरिता कर्ज घेण्यात येणार आहे. त्याचा सविस्तर प्रस्ताव पुढील आठवड्यात १० फेब्रुवारीला होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत सादर करावा, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांना केली.