

Farmers Agree to Offer Additional Land for Project
Sakal
पुणे : पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी संपादित करण्यात येणाऱ्या एक हजार २८५ हेक्टर जमिनीपैकी आतापर्यंत एक हजार २५४ हेक्टरची प्रत्यक्ष मोजणी पूर्ण झाली आहे. प्रस्तावित विमानतळालगत १४८ हेक्टर अतिरिक्त जमीन देण्यास शेतकरी तयार आहेत. तिची मोजणी येत्या आठवड्यात पूर्ण होऊन मोजणीचा अहवाल सरकारकडे पाठविण्यात येईल.