Purandar Airport: भूसंपादन दरनिश्चितीसाठी सोमवारी बैठक; पुरंदर येथील नियोजित विमानतळासाठी आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल
Purandar Airport Land Process: पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादन प्रक्रियेला वेग येत असून आगामी सोमवारी शेतकरी व प्रशासनाची महत्त्वाची बैठक होणार आहे. ३२(१) मान्यता मिळाल्याने आता नुकसानभरपाईचा दर ठरवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पुणे : पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी आवश्यक असणारी ३२(१)ची परवानगी राज्य शासनाकडून प्राप्त झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांशी वाटाघाटी करून भूसंपादनाचा दर निश्चित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.