मुंढे यांच्या प्रामाणिकपणाला पोलिसांनी केला सलाम; सापडलेली पर्स आणि मोबाईल केला परत

Sonia-Mundhe
Sonia-Mundhe

गोखलेनगर (पुणे) - सावित्रीबाई फुले विद्यापीठ येथे चौकात पूल पडण्याचे काम चालू असताना पोलीस आणि नागरिकांची मोठी कसरत होत आहे. गुरुवार (ता. ३०) रोजी सायंकाळी गर्दीच्या वेळी सांगावी येथील ऍक्टस फाऊंडेशनच्या सोनाली वानखेडे दुचाकीवरून जाताना गाडीला लावलेली पर्स पडली. पदपथाच्या कडेला पडलेली पर्स आपल्या पती सह जेवणाचे डबे देण्यासाठी चाललेल्या सोनिया मुंढे यांना दिसली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पतींना गाडी थांबवायला सांगून ती पर्स उचलली बघितले ए .टी .एम कार्ड आणि काही कागदपत्रे, मोबाईल त्यात होते. मुंढे यांनी जनवाडी पोलीस चौकी कडे धाव घेतली तेव्हा चतृशिंगी देवी मंदिर समोर पर्स मधील फोन वाजला,तेव्हा हा फोन आणि पर्स माझी असल्याचे वानखेडे यांनी मुंढे यांना सांगितले,आणि तुम्ही तिथेच थांबा असे सांगितले, सदर घटना जनवाडी पोलीस चौकी येथे सांगितली,पोलीस उपनिरीक्षक बसवराज माळी यांनी दोघीना जनवाडी चौकीत बोलावून खात्री करून.संस्थेची महत्वाची कागदपत्रे असलेली पर्स वानखेडे यांच्या स्वाधीन केली.

सोनिया मुंढे या शिवसेना महिला आघाडीच्या माध्यमातून सामाजिक काम करतात.त्यांच्या या प्रामाणिकपणा बद्दल चतृशिंगी पोलिस स्टेशनचे सह पोलिस निरीक्षक समीर चव्हाण यांच्या हस्ते गौरव करण्यात आला .या वेळी कलावती घाणेकर,भागश्री सागवेकर,दीपाली शिगवण,मंदा मुकणक आदी उपस्थित होते.

'माझी पर्स हरवली होती ती प्रामाणिकपणे मला परत केली. पर्समध्ये महत्त्वाची कागदपत्रे, ए.टी.एम, मोबाईल होता.जगात अशा प्रामाणिक लोकांची गरज आहे"
- सोनाली वानखेडे

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com