'टिलिमिली' मालिकेचे बदललेले वेळापत्रक जाहीर

सकाळ
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

जिल्ह्यातील टाळेबंदीच्या काळात १३ ते २३ जुलै २०२० या काळात टिलिमिली मालिकेचे चित्रीकरण बंद ठेवावे लागले होते. आता पुन्हा मालिकेचे चित्रीकरण सूरू होत आहे. परंतु दरम्यान मालिकेचे येत्या आठवड्यापासूनच्या वेळापत्रकात बदल करणे भाग पडले असून बदललेले वेळापत्रक नुकतेच जाहीर केले आहे

पुणे : पुणे जिल्ह्यातील जुलै महिन्याच्या अखेरीस जाहीर झालेल्या टाळेबंदीमुळे "टिलीमिली” या दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरील मालिकेचे चित्रीकरण अकरा दिवस बंद ठेवावे लागले. त्यामुळे या मालिकेच्या वेळापत्रकात येत्या आठवड्यापासून बदल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जिल्ह्यातील टाळेबंदीच्या काळात १३ ते २३ जुलै २०२० या काळात टिलिमिली मालिकेचे चित्रीकरण बंद ठेवावे लागले होते. आता पुन्हा मालिकेचे चित्रीकरण सूरू होत आहे. परंतु दरम्यान मालिकेचे येत्या आठवड्यापासूनच्या वेळापत्रकात बदल करणे भाग पडले असून बदललेले वेळापत्रक नुकतेच जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार प्रत्येकी एक तासात त्या-त्या इयत्तेचे प्रत्येकी २५ मिनिटांचे दोन पाठ होणार आहे. त्यात पाच मिनिटांचे मध्यांतर असणार आहे, अशी माहिती एमकेसीएल नॉलेज फाउंडेशनचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर उदय पंचपोर यांनी दिली आहे.

कोरोनाची साथ असताना, दुसरीकडे एक लाखाहून अधिक ज्येष्ठांना अन्य आजार

बदललेले इयत्तावार (रविवार वगळून) दैनंदिन  वेळापत्रक खालीलप्रमाणे असेल:

इयत्ता पाचवी ते आठवी : ०३ ते ३१ ऑगस्ट २०२०
वेळ :                                  इयत्ता
सकाळी ७.३० ते ८.३०            आठवी
सकाळी ९ ते १०.००    :           सातवी 
सकाळी १० ते ११.०० :              सहावी
सकाळी ११.३० ते दुपारी १२.३० पाचवी

   
आयटीआय प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू; ऑनलाईन अर्ज भरता येणार

(दिनांक १५ ऑगस्ट रोजी महामालिकेचे भाग प्रसारित होणार नाहीत.)

इयत्ता पहिली ते चौथी : ०१ ते सोमवार, २८ सप्टेंबर २०२०
वेळ :                                         इयत्ता
सकाळी ७.३० ते ८.३०                  चौथी
सकाळी ९ ते १०.०० :                    तिसरी
सकाळी १० ते ११.००                     दुसरी
सकाळी ११.३० ते दुपारी १२.३० :    पहिली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Announced the changed schedule of Tilimili series

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: