Pune News : 64 वर्षे सुरू असलेल्या लाड स्मृती व्याख्यानमालेचा प्रसार भारतीला पडला विसर

64 वर्षे सुरू असलेल्या पुरुषोत्तम मंगेश लाड स्मृती व्याख्यानमालेचा प्रसारभारतीला यंदा विसर
purushottam mangesh laad
purushottam mangesh laadsakal

पुणे : सलग 64 वर्षे सुरू असलेल्या पुरुषोत्तम मंगेश लाड स्मृती व्याख्यानमालेचा प्रसारभारतीला यंदा विसर पडला आहे. आकाशवाणीच्या पुणे केंद्राने प्रसार भारतीकडे या बाबतचा प्रस्ताव पाठवून दोन महिने उलटले तरी, हा कार्यक्रम घेण्यासाठी परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे ही व्याख्यानमाला खंडीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लाड हे देशाच्या माहिती आणि नभोवाणी मंत्रालयाचे पहिले सचिव होते. संत साहित्य, तत्त्वज्ञान, संस्कृती हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय होते. त्यावर त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. उत्कृष्ठ प्रशासक, विद्वान आणि देशभक्त अशी त्यांची ओळख होती. मूळचे सावंतवाडीचे असलेले लाड हे यांचे मराठी आणि संस्कृत भाषेवर प्रभुत्त्व होते. लंडनमध्ये त्यांचे उच्चशिक्षण झाले. तेथे ते बॅरीस्टर झाले. त्यानंतर ते ‘आसीएस’ परीक्षा उत्तीर्ण होऊन भारतात परतले. त्यांची 1952 मध्ये नभोवाणी खात्याचे पहिले सचिव म्हणून नियुक्ती झाली.

purushottam mangesh laad
Pune : स्पर्धा परीक्षांबाबत उद्या कोथरूडमध्ये मार्गदर्शन

आकाशवाणीची उभारणी आणि त्यावर कार्यक्रमांचे वैविध्य, यासाठी त्यांनी अफाट प्रयत्न केले. मार्च 1957 मध्ये त्यांचे वयाच्या 52 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 1958 पासून सलग 64 वर्षे ‘लाड स्मृती व्याख्यानमाला’ राज्यातील विविध शहरांत आयोजित करण्यात येते. राज्यातील विविध शहरांतील आकाशावाणी केंद्रांमार्फत त्याचे यजमानपद स्वीकारून कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. नियोजनपूर्वक या व्याख्यानमालेचे विषय, वक्ते, अध्यक्ष निश्चित केले जातात. प्रत्यक्ष व्याख्यान स्टेजवरून दिले जाते. त्यानंतर त्याचे ध्वनिमुद्रण राज्यातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून प्रसारित होते.

आत्तापर्यंत प्राचार्य शिवाजीराव भोसले, शिवशाहीर बाबसाहेब पुरंदरे, कॉम्रेड अशोक ढवळे, प्रा. गंगाधर गाडगीळ आदींनी त्यात आपले विचार मांडले आहेत. गेल्यावर्षी वर्षी ‘भारतीय सांस्कृतिक संबंधांचं वैश्विक महत्त्व’ या विषयवार भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांचे व्याख्यान झाले.

purushottam mangesh laad
Pune : राज्यात येत्या सोमवारपासून सक्षम पंधरवडा साजरा करणार; पेट्रोलियम मंत्रालयाच्यावतीने पुढाकार

दिलीप करंबेळकर हे विवेक माध्यम संस्थेचे आणि मुंबई दैनिक तरुण भारत चे व्यवस्थापकीय संचालक अध्यक्षस्थानी होते. आकाशवाणीच्या निवृत्त उद्घोषिका डॉ. प्रतिमा जगताप यांनी या या व्याख्यानमालेचा इतिहास, भाषणे,त्यांचे सार आणि आयोजकांचे अनुभव यांचा अभ्यास करून प्रबंध सादर केला आणि विद्यावाचस्पती ही पदवी मिळवली आहे.

लाड स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन यंदा आकाशवाणीच्या पुणे केंद्राकडे आहे. त्यामुळे या केंद्राचे संचालक इंद्रजित बागल यांनी व्याख्यानमाला आयोजित करण्यासाठी प्रसारभारतीकडे फेब्रुवारीअखेर प्रस्ताव पाठविला होता. परंतु, त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. या बाबत बागल यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘व्याख्यानमाला आयोजित करण्यासाठी आम्ही प्रस्ताव पाठविला आहे. त्याला मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा आहे. त्यानंतर व्याख्यानमाला आयोजित करू.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com