Education Success: ग्रामपंचायत शिपायाची मुलगी पूर्वा कदमची बारावीत ८६ टक्के गुणांसह चमक; सीए होण्याच्या स्वप्नाला आर्थिक बळाची प्रतीक्षा

प्रतिकूल परिस्थितीतही पूर्वा कदमचे बारावीत ८६ टक्के गुण; सीए होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदतीची गरज
Triumph Over Adversity: Purva Kadam Scores 86% in 12th Despite Losing Her Father to Swine Flu

Triumph Over Adversity: Purva Kadam Scores 86% in 12th Despite Losing Her Father to Swine Flu

Sakal

Updated on

प्रकाश शेलार

खुटबाव : गलांडवाडी( ता. दौंड) येथील पूर्वा संदीप कदम या विद्यार्थिनीने प्रतिकूल परिस्थितीत दैदिप्यमान यश मिळवत खुटबाव येथील भैरवनाथ विद्यालयात बारावीला ८६ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे आहेत. पूर्वाचे वडील संदीप कदम यांचे २०२२ मध्ये स्वाइन फ्लूने निधन झाले आहे. आई संध्या कदम यांनी शिलाई काम व ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई म्हणून काम करत पूर्वा व दोन भावंडांना शिक्षण देत आहेत. पूर्वाला आता सीए व्हायचे आहे. परंतु या शिक्षणासाठी लागणाऱ्या अवाजवी खर्चामुळे तिचे शिक्षण थांबण्याच्या वाटेवर आहे. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी तिच्या पंखांना बळ देण्याची गरज आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com