Pune : पुढील काही काळासाठी मला कॉल अथवा मेसेज करू नका; WhatsApp वर स्टेटस अन् लोणीकंद पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गायब

Wagholi Latest News In Marathi | लोणीकंद पोलीस ठाण्याचे डी बी विभागाचे उपनिरीक्षक राहुल खंडू कोळपे ( वय ३५ रा. वाघोली ) हे शुक्रवार ( दि २६ ) पासून बेपत्ता झाले आहे.
put Status on WhatsApp Do not call or message me  and sub-inspector of Lonikand police station missing
put Status on WhatsApp Do not call or message me and sub-inspector of Lonikand police station missingsakal
Updated on

वाघोली : लोणीकंद पोलीस ठाण्याचे डी बी विभागाचे उपनिरीक्षक राहुल खंडू कोळपे ( वय ३५ रा. वाघोली ) हे शुक्रवार ( दि २६ ) पासून बेपत्ता झाले आहे. ते हरविल्याची तक्रार लोणीकंद पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या प्रकाराने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोळपे यांनी शुक्रवारी आपले कर्तव्य बजावले. यानंतर घरी जेवण्यासाठी जातो असे सांगून ते निघून गेले. यानंतर त्यांनी आपल्या व्हाटसअप वर ' पुढील काही काळासाठी मला कोणी कॉल अथवा मेसेज करू नये. ' असे स्टेटस ठेवले. यानंतर फोन बंद करून ते निघून गेले.

ही माहिती कळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी त्यांना मोबाईल वर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क होवू शकला नाही. त्यांच्या घरी संपर्क साधला असता त्यांचे दोन्ही मोबाईल घरी असल्याचे समजले. त्यांच्या घरी पत्नी व दोन मुले आहेत.

put Status on WhatsApp Do not call or message me  and sub-inspector of Lonikand police station missing
Pune Rain Update : पुणे जिल्ह्यात सात मार्गांवरील वाहतूक बंद; पर्यायी मार्गाचा वापर करण्‍याचे पोलिसांचे आवाहन

कोळपे यांच्याविषयी कोणाला माहिती मिळाल्यास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर - 9821537314, पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) - 90499 81221, सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र गोडसे - 8082077100 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ते हरविल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. त्यांचा शोध सुरू आहे. असे पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) नीलेश जगदाळे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com