Pune : ‘पायरेक्सिया’ आजार नसून केवळ लक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘पायरेक्सिया’ आजार नसून केवळ लक्षण
‘पायरेक्सिया’ आजार नसून केवळ लक्षण

‘पायरेक्सिया’ आजार नसून केवळ लक्षण

पुणे : ताप किंवा ‘पायरेक्सिया’ हा आजार नसून शरीराचे तापमान वाढल्यामुळे दिसणारे लक्षण आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितलेल्या काही रक्त चाचण्यांमधून रुग्णाला आलेल्या तापाचे अचूक निदान होण्यास मदत होत आहे. ताप असलेल्यांना चिडचिड, सर्दी, डोकेदुखी, अंगदुखी, भूक न लागणे, अशक्तपणा, घाम येणे, चक्कर येणे, आळस आणि मळमळ अशा तक्रारी उद्भवू शकतात. त्यामुळे सामान्य ताप आल्यानंतर घाबरून न जाता वैद्यकीय सल्ला घ्या, असे अपोलो हायग्नोस्टिकच्या डॉ. कीर्ती कोटला यांनी सांगितले.

रक्त तपासणी

पांढऱ्या रक्त पेशी (डब्ल्यूबीसी) संसर्गाशी लढा देतात, म्हणून पांढऱ्या पेशींची वाढलेली पातळी संसर्गाचे सूचक आहे. ही चाचणी करून तुम्हाला काही संसर्ग झाला आहे की नाही हे डॉक्टर ठरवून योग्य उपचार देऊ शकतील.

वाइडल चाचणी

ही सॅल्मोनेला टायफी, सॅल्मोनेला पॅराटायफी ‘ए’, ‘बी’ आणि ‘सी’ची उपस्थिती शोधण्यासाठी घेतली जाते. जे आतड्यांसंबंधी तपासास फायदेशीर ठरतात. या चाचणीत रुग्णाच्या ‘सीरम’ आणि ‘सॅल्मोनेला अँटिजेन’ यांच्यातील एकत्रित प्रतिक्रिया सकारात्मक होऊ शकते. तुम्हाला सावध राहून आणि वेळेवर काळजी घ्यावी लागेल.

हिवताप निदान चाचणी

हिवतापाच्या निदान चाचणीसाठी रुग्णाचे रक्त एका काचेच्या पट्टीवर घेतले जाते. सूक्ष्मदर्शकाखाली केलेल्या विश्लेषणातून हिवतापाचे जंतूंचे अचूक निदान केले जाते. त्यासाठी ‘क्युबीसी मलेरिया’ चाचणी अचूक मानली जाते.

डेंगीच्या निदानासाठी

‘इएलआयएसए’ (इन्झाइम-लिंक इम्युन सॅार्बंट असे) ही डेंगीबद्दल जाणून घेण्यासाठी सामान्यतः वापरली जाणारी चाचणी आहे. एकूण प्रोटिनची वाढलेली पातळी, संसर्ग किंवा इतर दाहकस्थिती या चाचणीच्या माध्यमातून दर्शवते. ‘सीएसएप’मध्ये ग्लुकोजची कमी पातळी संसर्ग दर्शवू शकते.

असा करा ताप नियंत्रित

एक गुळगुळीत टॉवेल किंवा सुती कापड घ्या, थंड पाण्यात बुडवा, थंड टॉवेल मानेभोवती, कपाळावर व घोट्याभोवती गुंडाळाबेरी, टरबूज आणि संत्री यासारखी फळे खा. यात ‘सी व्हिटॅमिन’ भरपूर असते. त्यातून रोगप्रतिकारक शक्ती वाढते. मसालेदार पदार्थ टाळा.तापामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे शक्य तितके पाणी प्यावे. पुरेशी विश्रांती घेतल्याने ताप लवकर कमी होतो.

loading image
go to top