

Pune University Drops in QS Asia Rankings
Sakal
पुणे : क्यूएस वर्ल्ड रॅंकिंगने आशियामधील शैक्षणिक संस्थांची क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत देशातील पाच भारतीय तंत्रज्ञान संस्थांसह बंगळूर येथील भारतीय विज्ञान संस्थेने पहिल्या १०० मध्ये स्थान मिळवले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ‘एनआयआरएफ’ क्रमवारीबरोबरच क्यूएस रॅंकिंगमध्येदेखील घसरण झाल्याचे दिसून येते. याआधी आशियातील पहिल्या २०० शैक्षणिक संस्थांच्या क्रमवारीत असणाऱ्या पुणे विद्यापीठाची यंदा क्रमवारीत २०७ व्या क्रमांकावर घसरण झाली आहे.