
किरकटवाडी (पुणे) : मागील काही दिवसांपासून पुणे शहर आणि ग्रामीण भागातही रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे रुग्णालये आणि बेडची सुविधा अपुरी पडू नये, म्हणून पश्चिम हवेलीतील गावांसाठी अतिरिक्त स्वॅब कलेक्शन आणि विलगीकरण कक्षाची व्यवस्था करण्यासाठी नऱ्हे गाव येथील जे. एस. पी. एम टेक्निकल कॉलेज आणि झील एज्युकेशन सोसायटी या संस्थांच्या वसतिगृहांची तालुका आरोग्य अधिकारी सचिन खरात आणि हवेली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्याकडून पाहणी करण्यात आली. खडकवासला, खानापूर, सांगरून व शिवापूर या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या हद्दीतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींसाठी ही सुविधा करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सदर दोन्हीही संस्थांच्या इमारती कोरोना संदर्भात अधिग्रहीत करण्याचे आदेश काढले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना तपासणीचे अहवाल येईपर्यंत वेगळे ठेवण्यासाठी व्यवस्था उपलब्ध असावी म्हणून हे नियोजन करण्यात आलेले आहे. त्यासंदर्भात सदर ठिकाणी पाणी, शौचालये, बेड व इतर भौतिक सुविधा किती प्रमाणात उपलब्ध आहेत व आणखी कोणत्या सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे याबाबतची पाहणी तालुका आरोग्य अधिकारी सचिन खरात यांनी केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिक आणि प्रशासनाला संस्थेच्या वतीने जेवढे शक्य होईल तेवढे पूर्ण सहकार्य केले जाईल. प्रशासनाला मदत म्हणून खारीचा वाटा उचलण्यासाठी आमच्या संस्था सदैव तत्पर असतील असे झील एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक संभाजीराव काटकर, सचिव जयेश काटकर, जे.एस.पी.एम संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर ऋषीराज सावंत, डॉक्टर वसंत बुगडे यांच्याकडून सांगण्यात आले.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.