सावधान ! पुण्यातील `या` भागात तुमच्या सोबतही `असा` भयानक प्रकार घडू शकतो

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जून 2020


गोळीबार ते फातिमानगर चौक दरम्यान पथदिवे बंद असल्याचा फायदा घेत घडतायत लुटीचे प्रकार

कॅन्टोमेंट (पुणे) : सोलापूर रस्त्यावर गोळीबार मैदान ते फातिमानगर चौकादरम्यानचे स्ट्रीट लाईट दिवे मागिल अनेक महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांच्या प्रखर लाईटमुळे दुचाकीचालकांना अपघाताचा धोका वाढला आहे. सध्या लाॅकडाउनमुळे येथे वर्दळ कमी असल्याने रात्रीच्या वेळी काळोखाचा फायदा घेत लुटीचे प्रकार घडत आहेत. तसेच येथे पावसाचे पाणी हि मोठ्या प्रमाणात साचत असते. त्यामुळे महापालिकेच्या पथविभागाने या रस्त्यावरील स्ट्रीट लाईट तातडीने सुरू कराव्यात, अशी मागणी वाहनचालक आणि पादचाऱ्यांकडून होत आहे.

प्रवाशांच्या गर्दीने रेल्वे स्थानक पुन्हा गजबजले

लॉकडाऊनमुळे रस्त्यावर मागिल दोन महिन्यापासून वर्दळ कमी होती. त्यामुळे गोळीबार मैदान ते फातिमानगर चौक दरम्यान रस्त्यावरील स्ट्रीट लाईट बंद असल्याने मागिल दोन महिन्यामध्ये पादचारी आणि दुचाकीचालकांना लुटले आहे. मात्र, मागिल काही दिवसांपासून उद्योग-धंदे, कंपन्या सुरू झाल्यामुळे वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे रस्त्यातील खड्डे आणि रात्रीच्या वेळी अंधारात दुचाकीचालकांना धोका वाढला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पालिका प्रशासनाने तातडीने दखल घेऊन या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करत पथदिवे सुरू करण्याची गरज आहे, अशी मागणी कर्तव्य फाउडेशनचे अध्यक्ष विकास भांबुरे यांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The robbery took place between Fatimanagar Chowk and Fatima Nagar