esakal | जुन्नर : रुग्णवाहिका सेवेचा प्रश्न गंभीर; रुग्णांना होतोय मनस्ताप
sakal

बोलून बातमी शोधा

रुग्णवाहिका

जुन्नर : रुग्णवाहिका सेवेचा प्रश्न गंभीर; रुग्णांना होतोय मनस्ताप

sakal_logo
By
दत्ता म्हसकर

जुन्नर : जुन्नर येथील कोरोना रुग्णास कोव्हीड केअर सेंटर मध्ये दाखल करण्यासाठी वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने दुचाकीवरून दाखल केल्याची घटना ताजी असताना आपटाळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बाळंतपणासाठी आलेल्या महिलेला वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध झाली नसल्याची दुसरी घटना गुरुवारी ता.७ रोजी पहाटे घडली. यामुळे तालुक्यातील रुग्णवाहिका सेवेच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पहाण्याची गरज निर्माण झाली आहे. आदिवासी भागातील आपटाळे ता.जुन्नर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गरोदर मुलीस आईने बुधवारी ता.६ रोजी रात्री उशिरा प्रसुतीच्या वेदना होऊ लागल्याने मध्यरात्रीच्या सुमारास आणले.

हेही वाचा: केंद्रीय यंत्रणाच्या रडारावर बारामती, दोन ठिकाणी छापेमारी

यावेळी येथील परीचारिकेने महिलेची परिस्थिती पाहून त्यांना जुन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. गरोदर मातांच्या प्रवासासाठी असलेल्या १०२ या रुग्णवाहिकेच्या चालकास फोन केला असता त्याने गाडी खराब असल्याचे कारण सांगून १०८ नंबरला फोन करण्याचा सल्ला दिला तसेच गरोदर व डिलीवरी रुग्ण वाहण्याची जबाबदारी १०२ ची असते तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा असे सांगितले. पहाटे दीड वाजले असल्याने परिसरात खाजगी वाहन देखील उपलब्ध होत नव्हते. गर्भवती महिलेला तीव्र वेदना होत होत्या.

१४ व्या वित्त आयोगातुन खरेदी केलेल्या नवीन रुग्णवाहिकेच्या चालकाचा संपर्क होऊ शकला नाही. मात्र ही रुग्णवाहिका कोरोना रुग्ण वाहतुकीसाठी असून तीचे निर्जंतुकीकरण केले नसल्याचे कारण कर्मचार्‍यांकडून देण्यात आले. यानंतर येथील परिचारिकेने १०८ नंबरला फोन करुन कोणतीच गाडी उपलब्ध नसल्याने आपटाळे येथे येण्याची विनंती केल्यानंतर पहाटे २ वाजता रुग्णवाहिका आली. यानंतर महिलेस जुन्नरला हलविण्यात आले.

हेही वाचा: Pune : शुल्काच्या वादात विद्यार्थ्यांची कोंडी; पालक हतबल

यावेळी आपटाळे आरोग्य केंद्रात वैद्यकिय अधिकारी हजर नसल्याचे दिसून आले. रुग्णवाहिका चालक विविध कारणे सांगत सेवा टाळत असल्याचे दिसून आले. संबंधित महिला व तिच्या आईस मात्र दोन तास नाहक मनस्ताप सोसावा लागला.याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश गोडे यांनी आपटाळे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे सांगितले.

loading image
go to top