esakal | माळेगावात सत्ता कोणाचीही असो विकासाच्या खूणा जागोजागी पण...
sakal

बोलून बातमी शोधा

malegaon.jpg

भाजीमंडईला जागेचा अभाव, गायरान अतिक्रमणे, अवैद्य धंद्यांसारखे प्रश्न प्रलंबित

माळेगावात सत्ता कोणाचीही असो विकासाच्या खूणा जागोजागी पण...

sakal_logo
By
कल्याण पाचांगणे

माळेगाव (पुणे) : सत्ता राष्ट्रवादी अथवा भाजपची असो...सर्वांगिण विकासाच्या खूणा मात्र गावात जगोजागी दिसतात. हे दिशादायक दृष्य आहे बारामतीतील माळेगाव बुद्रूक गावाचे. पाच कोटीचे आरोग्य केंद्र, शासनाचा तुळजाभवानी देवस्थानला (बागेतील आई) क वर्ग दर्जा, रस्ते, शाळा दुरूस्ती व अंगणवाडी इमारती, स्मशानभूमींचे नुतनीकरण, वाढीव पाणी पुरवठा, मंदीर जिर्णोद्धार, भुयारी गटर योजनांना कोट्यवधीचा निधी खर्च झाला. मात्र, भाजीमंडईला जागेचा अभाव, गायरान अतिक्रमणे, अवैद्य धंद्यांसारखे प्रश्न अद्याप प्रलंबित राहिले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

माळेगाव ग्रामपंचायतीचा पाच वर्षाचा कार्यकाळ महिना अखेरीस संपत आसल्याने पदाधिकऱ्यांचा कारभाराचा लेखाजोखा सध्या चर्चेला जात आहे. बारामती तालुक्यात माळेगावला राजकियदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. चाळीस हजार लोकसंख्या, शैक्षणिक संस्था, माळेगाव साखर कारखाना आदी भौगोलीक स्थिती चांगली असल्याने राष्ट्रवादी पक्षाला हे गाव आपल्या ताब्यात असावे, हे कायम वाटते. परंतु, अडीच वर्षांपासून ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकत आहे. सरपंच जयदीप विलास तावरे, उपसरंपच अजित तांबोळी सध्या गावचा कारभार पाहत आहेत. तर जयदीप दिलीप तावरे यांनी मागिल अडीत वर्षात सरपंचपदावर काम केल्याची नोंद आहे. राजकिय दृष्ट्या गावच्या राजकारणात स्थित्यंतर जरी झाले असले तरी त्याचा विकास कामावर परिणाम झाला नाही, हे मात्र अनेकजण आवर्जुन बोलतात.

पुण्यात कोरोना रुग्णांचा २ लाखांचा आकडा होणार क्रॉस​

त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र, शासनाचा तुळजाभवानी देवस्थानला (बागेतील आई) क वर्ग दर्जा, रस्ते, शाळा दुरूस्ती व आंगणवाड्याच्या इमारती, सर्व स्मशानभूमींचे नुतनीकरण, वाढीव पाणी पुरवठा, मंदीर जिर्णोद्धार, क्रीडा संकूलच्या सेवासुविधा, भुयारी गटर योजना आदी महत्वकांक्षी कामे मार्गी लागली. त्यासाठी आमदार फंड, जिल्हा परिषद व पंचायत समितीचा विकास निधी मोठ्या प्रमाणात खर्च झाला. तसेच गतवर्षी भाजपचे राज्यसरकार असताना तत्कालिन पालकमंत्री गिरिष बापट यांनीही पुरेसा निधी देण्याचा प्रयत्न केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

माळेगावची विकासाची घौडदौड सुरू राहण्यासाठी सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शासनस्तरावर तब्बल पाच कोटी रूपये उपलब्ध करून दिले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे, संजय भोसले, दिकप तावरे, अशोक सस्ते आदींनी दिली. दुसरीकडे, माळेगाव-नागेश्वरनगर येथील अडीच किलोमीटर लांबीची महत्त्वकांक्षी भूमिगत गटर योजना अशोक सस्ते आदींच्या पुढाकारातून मार्गी लागली. सदर सांडपाण्याचा २५ वर्षाचा प्रश्न सुटण्यासाठी प्रविण दळवी, दिपक जगताप, संतोश मुथा, विजयसिंह जाधवराव इत्यादींचे सहकार्य झाल्याचे सांगण्यात आले. व्यापक सामाजिक हित डोळ्यासमोर ठेवले तर विविध पक्षांतील राजकिय मंडळीसुद्धा चांगले काम करू शकतात, याचे उत्तम उदाहरण माळेगाव येथे पहावयास मिळते, असे मत कार्य़कर्ते अशोक सस्ते यांनी मांडले.