esakal | पुण्यात कोरोना रुग्णांचा २ लाखांचा आकडा होणार क्रॉस
sakal

बोलून बातमी शोधा

two lakh corona patients to cross in Pune

राज्यातील पहिला कोरोना रुग्ण ९ मार्च २०२० ला पुणे शहरात सापडला होता. त्यामुळे बरोबर सहा महिन्यांत पुणे जिल्ह्यातील एकूण रुग्ण दोन लाखांचा आकडा ओलांडत असल्याचा योगायोग जुळून आला आहे. 

पुण्यात कोरोना रुग्णांचा २ लाखांचा आकडा होणार क्रॉस

sakal_logo
By
गजेंद्र बडे

पुणे : पुणे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा आज (ता.७) दोन लाखांच्या काठावर पोहोचला आहे. दररोज चार हजारांहून अधिक नवे रुग्ण सापडत असल्याने, मंगळवारी (ता.८) पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा दोन लाखांचा आकडा क्रॉस होणार आहे. जिल्ह्यात आज ४ हजार २७३ नवे रूग्ण आढळून आले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्यातील पहिला कोरोना रुग्ण ९ मार्च २०२० ला पुणे शहरात सापडला होता. त्यामुळे बरोबर सहा महिन्यांत पुणे जिल्ह्यातील एकूण रुग्ण दोन लाखांचा आकडा ओलांडत असल्याचा योगायोग जुळून आला आहे. आज आढळून आलेल्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील २  हजार ५३ रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, ७६ जणांचा मृत्यू झाला आहे.

पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच पिंपरी-चिंचवडमधील १ हजार २५९, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ७५६, नगरपालिका क्षेत्रात १७८  आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रात २७ रुग्णांचा समावेश आहे.

पुण्यात रुग्ण फिरला तीन तास अन् उपचार पिंपरीत 

गेल्या चोवीस तासांत मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांमध्ये  पुणे शहरातील सर्वाधिक ३७ रुग्ण आहेत. पिंपरी चिंचवडमधील १७, जिल्हा परिषद क्षेत्रातील १४, नगरपालिका क्षेत्रातील ६ आणि  कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचे नवे रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूंची संख्या ही काल (ता. ६) रात्री ९ वाजल्यापासून आज (ता. ७) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे.

दरम्यान, आज दिवसभरात ३ हजार ९३  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये पुणे शहरातील १ हजार ६३९, पिंपरी चिंचवडमधील ६७६, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ५५२, नगरपालिका क्षेत्रातील १२५ आणि कॅंटोन्मेंट बोर्डातील १०१ जण आहेत.

शेतकरी मालामाल, टोमॅटोची दोन तासांतच साडेतीन कोटीची उलाढाल

दीड लाखांहून अधिक कोरोनामुक्त 

एकीकडे नवीन कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली असली तरी उपचारामुळे बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. यानुसार आतापर्यंत १ लाख ५७ हजार २९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये पुणे शहरातील ८८ हजार ५७९ जणांचा समावेश आहे.