mahavitaran recruitment
sakal
- प्रज्वल रामटेके
पुणे - महावितरणमध्ये सरकारी नोकरीचे स्वप्न उराशी बाळगून बसलेल्या हजारो तरुणांच्या पदरी पाच वर्षांनंतरही केवळ निराशाच पडली आहे. ‘महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड’च्या (महावितरण) २०१९ मधील ‘उपकेंद्र सहाय्यक’ भरती प्रक्रियेतील प्रतीक्षा यादीतील ७५७ उमेदवारांना पाच वर्षांनंतरही नियुक्ती मिळालेली नाही.