Air Pollution: रब्बी हंगामातील शेतजळणीकडे दुर्लक्ष; उत्तर प्रदेश-पंजाबमध्ये प्रदूषण झपाट्याने वाढल्याचा IITM चा अभ्यास

रब्बी हंगामातील गव्हाच्या धसकट जाळण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; उत्तर प्रदेश-पंजाबमध्ये एप्रिल-मे महिन्यांत शेतजळणी चौपट, उन्हाळ्यातही पीएम २.५ धोकादायक पातळीवर
Rabi Stubble Burning Study

Rabi Stubble Burning Study

Sakal

Updated on

प्रज्वल रामटेके

पुणे : हवेच्या प्रदूषणावर आणि शेतजळणीवर चर्चा झाली की दरवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमधील भातशेतीच्या धसकट जाळण्याकडेच सर्वाधिक लक्ष दिले जाते. मात्र, गव्हाची काढणी झाल्यानंतर एप्रिल-मे महिन्यांत होणाऱ्या शेतजळणीचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे. विशेषतः उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये गेल्या दहा वर्षांत या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. परिणामी, उन्हाळ्यातही हवेतील सूक्ष्म प्रदूषकांचे प्रमाण धोकादायक पातळीवर पोहोचत असल्याने शेतजळणीविरोधातील धोरण केवळ खरीप हंगामापुरते मर्यादित न ठेवता रब्बी हंगामासाठीही स्वतंत्र उपाययोजना करण्याची गरज संशोधकांनी व्यक्त केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com