stray dog attack
sakal
पिंपळवंडी - उंब्रज (ता. जुन्नर) नंबर २ येथील शेवाळपाईन परिसरात शुक्रवारी (ता. ४) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास एका पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालत दहशत निर्माण केली. या कुत्र्याने एका ८० वर्षीय वृद्ध महिलेसह एका तरुणावर भीषण हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच चार गायी आणि तीन पाळीव कुत्र्यांनाही चावा घेतला. स्थानिक तरुणांनी प्रसंगावधान दाखवत या पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त केल्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला.